T20 World Cup 2024: जगज्जेत्यांना प्रत्येकी 5 कोटी
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या करंडकावर आपले नाव कोरणाऱया हिंदुस्थानी संघाला ‘बीसीसीआय’ने 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या बक्षीस रकमेची जगज्जेत्या संघातील सर्व 15 खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, सहयोगी स्टाफ व संघनिवड समिती या सर्वांना विभागणी होणार आहे. यातील सर्वाधिक 5-5 कोटी रुपयांचा वाटा खेळाडूंना मिळणार असून कोचिंग स्टाफला प्रत्येकी अडीच कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार जगज्जेत्या टीम इंडियातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये देऊन गौरविण्यात येणार असून चार राखीव खेळाडूंनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. कोचिंग स्टाफमधील टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे या चार जणांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये मिळणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List