राज कपूरच्या गॅरेजमध्ये रहात होते कुटुंब, फोटो पाहून ओळखता येतो का हा सुपरस्टार?

राज कपूरच्या गॅरेजमध्ये रहात होते कुटुंब, फोटो पाहून ओळखता येतो का हा सुपरस्टार?

अभिनेता राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केल. अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. 1988 मध्ये राज कपूर यांचे निधन झाले. पण, अजूनही राज कपूर यांचे नाव सिनेजगतात कायम आहे. राज कपूर त्यांच्या औदार्यासाठीही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांनी आपल्या गॅरेजमध्ये त्यांनी एका कुटुंबाला राहण्यासाठी जागाही दिली होती. त्या कुटुंबातील एक मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याची संपत्ती जवळपास 134 कोटी इतकी आहे. चला जाणून घेऊ कोण आहे तो सुपरस्टार?

त्या सुपरस्टारचा हा बालपणीचा फोटो आहे. या चित्रात अनेक मुले दिसत आहेत. त्यात हा सुपरस्टार दडला आहे. फोटोच्या उजव्या कोपऱ्यात दिसणारा त्या लहान मुलाचे नाव आहे अनिल कपूर. हा फोटो अनिल कपूर यांचा मोठा भाऊ निर्माता बोनी कपूर यांनी त्यांच्या X हँडलवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनिल जेवताना कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

अनिल कपूर यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर हे निर्माता होते. त्यांनी अनेक चित्रपट केले. मात्र, सुरिंदर कुटुंबासह मुंबईला रहायला आले तेव्हा त्यांना मुंबईत राहायला जागा नव्हती. त्यामुळे राज कपूर यांनी सुरिंदर यांना आपल्या गॅरेजमध्ये कुटुंबासह रहायला जागा दिली होती. काही काळाने त्यांनी भाड्याने खोली घेतली. विशेष म्हणजे अनिल याचे वडील सुरिंदर आणि राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे चुलत भाऊ होते.

तेलगू चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण

अनिल कपूर याने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी सिनेमातून नव्हे तर तेलुगू सिनेमातून मुख्य अभिनेता म्हणून केली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘वंश वृक्षम’मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती. त्याआधी 1779 मध्ये आलेल्या ‘हमारे तुम्हारे’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये अनिल कपूर एका स्पोर्टिंग भूमिकेत दिसला होता. बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी त्याने आणखी तीन चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून भूमिका केल्या होत्या. 1983 मध्ये आलेल्या ‘वो सात दिन’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

आलिशान जीवन जगणारा अनिल कपूर आता एका प्रायव्हेट जेटचा मालक आहे. त्याचे मासिक उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे. तर, एकूण संपत्ती 134 कोटी रुपये आहे. मुंबईतील जुहू येथे 30 कोटींचे आलिशान घर आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण करूनही अनिल कपूरची आजही प्रचंड क्रेझ आहे. सध्या अनिल कपूर बिग बॉस ओटीटी 3 होस्ट करत आहे. एका एपिसोडसाठी तो 2 कोटी इतके मानधन घेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;