जालन्यात माथेफिरूने केला तरुणाचा निर्घृण खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

जालन्यात माथेफिरूने केला तरुणाचा निर्घृण खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

जालना शहरातील मियासाहेब दर्गा येथे 8 जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शेख समीर शेख जमील (25) रा. मियासाहेब दर्गा जालना असं मयत तरुणाचे नाव आहे.

शेख समीर हा तरुण जेवण करून घराबाहेर आला असता एका माथेफिरू व्यक्तीने तरुणाच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. त्यात तरुण रक्तबंबाळ झाला. यावेळी परिसरील नागरिकांनी त्यास उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खाजगी रुग्णालयातून डॉक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात पाठवले. घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

सदर व्यक्तीचा मृतदेह जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून जो पर्यंत मारेकऱ्याला पोलिस अटक करत नाही, तो पर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा मयातच्या नातेवाईकांनी दिला आहे. माथेफिरू व्यक्ती कोण होता, त्याने असं अचानकपणे मयत समीर याच्या पोटावर आणि छातीवर 8 ते 10 वार का केले हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही. दरम्यान या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयत समीर हा कपड्याच्या दुकानावर कामाला होता. दुकानाला सुट्टी असल्याने तो जालना येथील त्याच्या घरी आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;