सलमान खान याच्या कानाखाली ‘या’ अभिनेत्रीने काढला जाळ, म्हणाली, मला उचलून त्याने…

सलमान खान याच्या कानाखाली ‘या’ अभिनेत्रीने काढला जाळ, म्हणाली, मला उचलून त्याने…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपट केले आहेत. सलमान खान मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. नुकताच सलमान खान याच्याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय.

चित्रपटाच्या सेटवर सलमान खान याने अभिनेत्रीसोबत असे काही केले की, अभिनेत्रीने रागाच्या भरात थेट सलमान खान याच्या कानाखाली मारली. अभिनेत्री हिमानी शिवपुरीने मोठा खुलासा केलाय. हिमानी शिवपुरी म्हणाल्या की, मी ज्यावेळी सलमान खान याला पहिल्यांदा भेटले, त्यावेळी सूरज बडजात्या हे सीन समजावून सांगत होते. त्यावेळी सलमान खान याने ठिक म्हणूनही सांगितले होते.

सीन शूट करत असताना अचानक सलमान खान याने आंटी जान म्हणत मला उचलून घेतले. मग मी थेट सलमान खान याच्या कानाखाली लावली. यानंतर सेटवर उपस्थित आणि सूरज बडजात्या हे देखील हैराण झाले. पाच मिनिटे कोणालाच समजले नाही की, नेमके सुरू काय आहे? सलमान खान खूप जास्त खोडकर असल्याचेही हिमानी शिवपुरीने यांनी सांगितले.

आता हिमानी शिवपुरी यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हम आपके हैं कौन, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ हैं, जब प्यार किसी से होता है, बीवी नंबर 1 अशा चित्रपटांमध्ये सलमान खान आणि हिमानी शिवपुरीने काम केले. सलमान खान हा रिअॅलिटी शो बिग बॉसला ही गेल्या काही वर्षांपासून होस्ट करताना दिसतो. यामधून मोठी कमाई सलमान खान करतो.

सलमानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खान याचे चाहते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहेत. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमकी मिळताना दिसत आहे. हेच नाहीतर सलमान खानच्या मुंबईतील घरावर 14 एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. मुंबई पोलिसांनी अवघे काही तासांमध्येच या आरोपींना अटकही केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;