फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्रामवर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. हिंदीसोबतच मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यासाठी करण सज्ज झाला आहे.करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित, कॉमेडीने भरपूर, युनिक कथा असलेला  ‘एक दोन तीन चार’ ह्या नव्या मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजक करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी आज करण केंद्रित एक खास टीझर रिलीज केला आहे. ज्यात करणचे धमाकेदार पंचलाइन खळखळून हसवत आहेत.

भूमिकेविषयी करण काय म्हणाला?

सोशल मिडिया गाजवल्या नंतर करण चे फॅन्स त्याच्या ह्या नव्या अवताराची आतुरतेने वाट बघताय. प्रेक्षकांचा हा उत्साह बघता, करणने आपल्या भावना शेअर केल्या आहेत. मला कळविण्यात आनंद होतोय की, आज माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. तुम्हां सर्वांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत प्रवास करू शकलो. मला आशा आहे की, इंस्टाग्राम वर जस तुम्हीं माझ्यावर भरभरून प्रेम करता. तसंच मोठ्या पडद्यावरही मला बघताना कराल, असं करण म्हणाला.

माझ्या प्रत्येक कामातून प्रेक्षकांना आनंद देण्याचा मी नक्किच प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. ‘एक दोन तीन चार’ सारख्या युनिक कथनाकेमध्ये मला सहभागी केल्याबद्दल जिओ स्टुडिओज आणि वरुण नार्वेकर यांचा मी आभारी आहे. निपुण आणि वैदेही तसेच इतर कलाकारांबरोबर काम करतांना भरपूर मज्जा आली, असंही करण सोनावणे म्हणाला.

सिनेमात कोण-कोण कलाकार?

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘एक दोन तीन चार’ ह्या चित्रपटात वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी हे मुख्य भूमिकेत आहेत. तर मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर दमदार भूमिकेत दिसणार आहेत.  त्यामुळे ह्या सर्वांसोबत करणची जुगलबंदी नक्की कशी जमते? हे बघणं औत्युक्याचं असणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, एक दोन तीन चार चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;