तिसऱ्या घटस्फोटानंतर १९ वर्ष लहान तरुणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिपलॉक फोटो व्हायरल

तिसऱ्या घटस्फोटानंतर १९ वर्ष लहान तरुणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिपलॉक फोटो व्हायरल

प्रेमासमोर ना धर्म आडवा येता ना वय. अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी वयापेक्षा लहान व्यक्तीसोबत विवाह केला आहे. जेव्हा मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असते तेव्हा त्याची चर्चा होते. बलिवूडमध्ये असे अनेक जोडपी आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही सध्या जिवंत उदाहरण आहेत. मलायका अर्जुनपेक्षा मोठी असल्याने अनेक वर्षांपासून दोघेही ट्रोल झाले होते. पण आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री १९ वर्षाच्या तरुणांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा आवडला आहे. या अभिनेत्रीने तिच्यापेक्षा जवळपास निम्म्या वयाच्या मुलासोबत नाते जाहीर केले आहे. ही अभिनेत्री 48 वर्षांची आहे, तर तिचा प्रियकर केवळ २९ वर्षांचा आहे. म्हणजेच अभिनेत्री ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे तो तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे. या अभिनेत्रीचे नाव किम मार्श आहे आणि आता ती तिचा को-स्टार सॅम्युअल थॉमसच्या प्रेमात पडली आहे.

अभिनेत्री किम मार्शच्या आयुष्यात प्रेमाने पहिल्यांदाच दार ठोठावलेले नाही. याआधी अभिनेत्रीचे तीन वेळा लग्न झाले आहे. आता तिसरे लग्न संपून फक्त एक वर्ष उलटले आहे की तिने नवीन नात्याची घोषणा केली आहे. किम मार्शने आता तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये किम मार्श तिचा को-स्टार सॅम्युअल थॉमससोबत लिप लॉक करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kym Marsh (@marsh_kym)

ही पोस्ट शेअर करताना किम मार्शने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Met the most amazing man ever! कधीकधी सर्वात अनपेक्षित गोष्टी सर्वात अनपेक्षित वेळी घडतात. सॅम्युअल थॉमस, मी तुझ्यावर प्रेम करते.’ किम एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री, गायिका आणि टीव्ही अँकर आहे.  ‘द लॉस ॲडजस्टर’ या चित्रपटात तुम्ही तिला पाहिले असेलच. याशिवाय ती पॉपस्टार्स, डॉक्टर्स, होल्बी सिटी, वॉटरलू रोड आणि स्ट्रिक्टली कम डान्सिंग या शोमध्ये दिसली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;