आमिर खान याने पहिल्या लग्नाबद्दल केला अत्यंत मोठा खुलासा, घटस्फोटाच्या तब्बल…

आमिर खान याने पहिल्या लग्नाबद्दल केला अत्यंत मोठा खुलासा, घटस्फोटाच्या तब्बल…

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आमिर खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. आमिर खानचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, आमिर खान याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता, त्याने स्पष्ट केले की, तो आता पुढील काही दिवस फक्त आणि फक्त कुटुंबाला वेळ देणार आहे.  लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्याने तो निराश झाल्याचे सांगितले जाते. 

फक्त चित्रपटच नाहीतर अमिर खान हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खान याने वयाच्या 21 व्या वर्षी रिना दत्तासोबत लग्न केले. त्यावेळी दोघे शेजारीच राहत होते. सुरूवातीला आमिर खान याला लग्नाला रिनाने नकार दिला होता, मात्र त्यानंतर यांनी काही वर्ष डेट केले आणि मग कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा करत आमिर खान हा म्हणाला की, मी आणि रिनाने गुपचूप कोर्ट मॅरेज केले. त्यावेळी आमच्यासोबत तीन साक्षीदार या लग्नाला उपस्थित होते. माझे आणि रिनाचे लग्न खूप म्हणजे खूप कमी पैशांमध्ये झाले. मी 211 क्रमांकाची बस घेतली आणि त्यावेळी 50 पैशांचे तिकीट घेतले. स्टेशनवरून मी हायवेवरून चालत गेलो आणि त्यानंतर गृह निर्माण भवनात पोहोचलो. 

तिथेच आम्ही लग्न केले. 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात त्यावेळी माझे लग्न झाले. आमिर खान आणि रिना यांचे लग्न 16 वर्ष टिकले. 2002 मध्ये आमिर खान आणि रिना यांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खान याने किरण राव हिच्यासोबत लग्न केले. रिना आणि आमिर खान यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच रिना आणि आमिर खानची मुलगी इरा खान हिचे लग्न नुपूर शिखरे याच्यासोबत झाले. 

आमिर खान याची दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत देखील आमिर खानचा घटस्फोट झालाय. मात्र, असे असताना देखील किरण राव आणि आमिर खान हे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. किरण राव आणि आमिर खान यांचा देखील एक मुलगा आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. यांच्या घटस्फोटानंतरन विविध चर्चा देखील रंगताना दिसल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;