मोदी है तो मुमकीन है… भाजप खासदाराच्या लोकसभेतील विजयाचे सेलिब्रेशन, जनतेला वाटली दारू
अलिकडेच पार पडलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एका भाजप खासदाराने जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी जनतेला चक्क दारूच्या बाटल्या वाटल्या आहेत.
कर्नाटक जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर भाजप खासदार के. सुधाकर यांनी लोकसभा मतदार संघातून जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये खुलेआम दारू वाटण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर “मोदी है तो मुमकिन है” असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
सदर व्हिडीओमध्ये दारूसाठी रांग लागल्याचे दिसत आहे. या पार्टीसाठी के. सुधाकर यांनी पोलिस विभागाला पत्र लिहून सुरक्षा तैनात करण्याची मागणी केली होती. दारू वाटपासाठी सुरक्षेची गरज भासेल असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. दुपारी 12.30 वाजल्यापासून, कार्यक्रमाला सुरूवात होईल त्यानंतर जेवण आणि दारूची व्यवस्था केली जाईल, असे पत्रात लिहिण्यात आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List