विकी भैया, कतरिना भाभी मारती नहीं हैं क्या?; ‘तो’ फोटो व्हायरल झाल्याने विकी कौशल ट्रोल

विकी भैया, कतरिना भाभी मारती नहीं हैं क्या?; ‘तो’ फोटो व्हायरल झाल्याने विकी कौशल ट्रोल

बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल कायमच चर्चेत असतो. सध्या विकी काैशल हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विकी काैशल याचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. या चित्रपटातील एक गाणे उद्या रिलीज होणार आहे. विकी काैशल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसतोय. विकी काैशल याचा कोणताही चित्रपट असो पतीच्या सपोर्टसाठी कायमच कतरिना कैफ ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमध्ये अत्यंत शाही थाटात लग्न केले.

विकी काैशल आणि बॉलिवूड अभिनेत्री तृप्ति डिमरी यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. पाण्यामधील हा फोटो असून तृप्ति डिमरी आणि विकी काैशल रोमांटिक होताना दिसत आहेत. या फोटोनंतर लोकांना थेट कतरिना कैफ हिची आठवण आलीये. मुळात म्हणजे तृप्ति डिमरी हिनेच या फोटोसोबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

मुळात म्हणजे तृप्ती डिमरी हिने शेअर केलेला हा फोटो चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा आहे. हा फोटो शेअर करत तृप्ती डिमरीने लिहिले की, चित्रपटाचे दुसरे गाणे 9 जुलै रोजी रिलीज होणार आहे. ‘जानम’ असे तिने लिहिले आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. अनेकांनी विकी काैशल याची फिरकी घेतलीये. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

एकाने या पोस्टवर कमेंट कर म्हटले की, विक्की भैया, कटरीना भाभी मारती नहीं हैं क्या?;. दुसऱ्याने लिहिले की, कतरिना कैफच्या हातामधून विकी काैशल सुटत जात आहे. तिसऱ्याने लिहिले की, आज रात्री नक्कीच विकी काैशलला जेवायला मिळणार नाहीये, कतरिनाचा अजिबातच धाक विकीवर राहिला नाहीये.

अजून एकाने लिहिले की, विकी भैया तुला कतरिनाने खूप जास्त मोकळे सोडले आहे. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. सोशल मीडियावर कतरिना कैफ सक्रिय दिसते. विकी काैशल याच्यासोबतचे खास फोटो शेअर करताना कायमच कतरिना दिसते. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;