मोठी बातमी! जम्मू-कश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांकडून चोख प्रत्युत्तर

मोठी बातमी! जम्मू-कश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांकडून चोख प्रत्युत्तर

जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण लष्कराच्या 9 कॉर्प्सच्या अखत्यारित येते. दरम्यान, मिळालेल्या नवीन माहितीनुसार दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जम्मू आणि कश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा भाग हिंदुस्थानी लष्कराच्या 9 कॉर्प्सच्या अंतर्गत येतो’.

दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जवानांनी तात्काळ गोळीबार करत प्रत्त्युत्तर दिलं.

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजौरी जिल्ह्यातील माजाकोट भागात 7 जुलै रोजी लष्कराचा एक जवान जखमी झाल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;