विराट कोहली लंडनला पोहोचताच अनुष्का शर्मा हिने शेअर केला खास फोटो, मुंबईहून थेट..

विराट कोहली लंडनला पोहोचताच अनुष्का शर्मा हिने शेअर केला खास फोटो, मुंबईहून थेट..

T20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली हा भारतामध्ये दाखल झाला. वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो आपल्या टीमसोबत उपस्थित होता. मात्र, त्यानंतर गुरूवारी रात्री विमानतळावर विराट कोहली स्पॉट झाला. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लगेचच विराट कोहली हा लंडनकडे रवाना झाला. यावेळी विराट कोहली याचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अनुष्का शर्मा हिने मुलगा अकाय याला लंडनमध्येच जन्म दिलाय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच स्थायिक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून तशी चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील अनुष्का शर्मा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा ही दिसते. भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केली होती.

अनुष्का शर्मा हिने आता नुकताच एक अत्यंत खास असा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. अनुष्का शर्मा हिने नाश्त्याच्या प्लेटचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे चार प्लेट दिसत आहेत. ब्लॅकबेरी, चेरी आणि स्ट्रॉबेरी हे दिसत आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसत आहेत.

 

 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याची चर्चा असताना विराट किंवा अनुष्का यांनी कोणीच यावर भाष्य केले नाहीये. मध्यंतरी एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या फोटोमध्ये विराट कोहली आणि वामिका एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत होते. व्हायरल होणारा फोटो मागच्या बाजूने काढलेला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, त्यांनी मुलाचा फोटो शेअर केला नाही. हेच नाहीतर मुलगी वामिका हिचा देखील एकही फोटो किंवा व्हिडीओ विराट आणि अनुष्काने शेअर केला नाही. काही दिवसांपूर्वी एक फोटो अनुष्काने शेअर केला होता. त्यामध्ये दोन पेंटिंग काढण्यात आल्या होत्या. एका बाजूला अनुष्काचे नाव होते तर दुसऱ्या बाजूला वामिकाचे नाव होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;