कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड? दोघांपैकी कोण अधिक श्रीमंत, वयात किती अंतर?
27 वर्षीय क्रिकेटर स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशिपला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त स्मृतीने बॉयफ्रेंड पलाशसोबत केक कापला. या सेलिब्रेशनचे फोटो पलाशने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
#5 असं कॅप्शन देत पलाशने स्मृतीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटो मध्ये दोघं सोबत केक कापताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझ दिला आहे. हे फोटो पाहताच स्मृतीचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
पलाश मुच्छल हा भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडमधील बरीच गाणी संगीतबद्ध केली आहेत. पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पलकने सलमान खान, हृतिक रोशन यांची अनेक हिट गाणी गायली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List