तीन वर्षापासून फुटलेल्या बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पुन्हा चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तीन वर्षापासून फुटलेल्या बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पुन्हा चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भंडारा जिल्ह्यातील सेलोटी रोड परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते मानेगाव बेळा पर्यंत जोडणाऱ्या पानदान रस्त्याचे काम मागील काही दिवसापूर्वी करण्यात आले होते. या रस्त्यावर आदर्श नगर कडून सेलोटीकडे जाणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम झाले होते. बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मागील तीन वर्षापासून बंधारा फुटला असून लाखनी मानेगाव बेळा येथे जाणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी आणि शेतीपूरक वाहनांसाठी बंद झालेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा तहसील कार्यालय लाखनी येथे अर्ज विनंती केली. मात्र याचा काही फायदा झालेला नाही. यामुळे सदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे उन्हाळ्यामध्येच निवेदन सादर केले होते.  पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. यावर शेतकरी नाराज असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही अदयाप काम सुरु झाले नाही. त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्याल का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.  प्रशासनाने एकदा तरी लक्ष देत, चौकशी करून परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;