शिरीन-श्रेयस-दिघ्याची ‘पुन्हा दुनियादारी’; टिकटिक वाजणार, धडधड वाढणार

शिरीन-श्रेयस-दिघ्याची ‘पुन्हा दुनियादारी’; टिकटिक वाजणार, धडधड वाढणार

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार, अशी बातमी सर्वत्र झळकली होती. तेव्हापासूनच खरंतर सर्वत्र या चित्रपटाविषयी चर्चा रंगली होती. अनेक तर्क-वितर्कही लढवले जात होते. परंतु आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर या चित्रपटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. ‘पुन्हा दुनियादारी’ असं या चित्रपटाचं नाव असून ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘पुन्हा दुनियादारी’मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली, तरी त्यांची कट्टा गँग ‘पुन्हा दुनियादारी’त त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांना सहाय्य केलं आहे. उषा काकडे यांनी नुकतंच उषा काकडे प्रॉडक्शन सुरु केलं असून त्या आगामी ‘विकी : फुल्ल ऑफ लव्ह’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याव्यतिरिक्त त्या व्यावसायिका आणि समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. एवीके पिक्चर्स, उषा काकडे प्रोडक्शन्स, मैटाडोर प्रोडक्शन, व्हिडीओ पॅलेस निर्मित प्रदर्शित होणाऱ्या ‘पुन्हा दुनियादारी’ या चित्रपटाचं लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.

या चित्रपटाबाबत निर्माते अमेय खोपकर म्हणाले, “2013 मध्ये ‘दुनियादारी’ आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पाहाता ‘पुन्हा दुनियादारी’ची उत्सुकता रसिकवर्गाला लागली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मैत्री प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, निनाद बत्तीन आणि संपूर्ण टीमसोबत माझे ऋणानुबंध आहेत. या टीमसोबत काम करताना अतिशय आनंद होतोय. ‘पुन्हा दुनियादारी’मध्ये आता मैत्रीत आणि प्रेमात काय वळणं येणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.”

निर्मात्या उषा काकडे म्हणाल्या, ”दुनियादारी ही माझी सर्वात आवडती फिल्म आहे. या फिल्मचा दुसरा पार्ट येतोय आणि मी त्याची निर्मिती करतेय याचा मला प्रचंड आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शकांच्या निर्माती म्हणून पाठीशी उभं राहून मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध करणं हा माझा मानस आहे.”

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम ‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. अकरा वर्षांची आतुरता संपत अखेर ‘पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केलं. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्राँग आहे की, त्याचे पडसाद ‘पुन्हा दुनियादारी’मध्ये निश्चितच दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;