बिग बॉसच्या घरातील वाद टोकाला, विशालच्या आई वडिलांनी केली मोठी मागणी, अरमान मलिक…

बिग बॉसच्या घरातील वाद टोकाला, विशालच्या आई वडिलांनी केली मोठी मागणी, अरमान मलिक…

बिग बॉस ओटीटी 3 सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये विकेंडच्या वारनंतर मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाहीतर पायल मलिक ही बिग बॉसच्या मंचावर आली आणि तिने विशाल पांडे याची पोलखोल केली. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल अत्यंत धक्कादायक विधान विशाल पांडे याने केले. विशाल पांडे याने कटारिया याच्या कानामध्ये चक्क म्हटले की, भाभी मला चांगली वाटते. यानंतर एकच मोठा गोंधळ बिग बॉसच्या घरात बघायला मिळाला. अनिल कपूर यांनीही विशालला चांगलेच सुनावले.

यासर्व प्रकारानंतर अरमान मलिक हा विशाल पांडे याच्याकडे जातो आणि त्याला विचारणा करत असताना अरमान मलिक याचा संताप वाढतो आणि तो थेट विशालच्या कानाखाली लावतो. पत्नीबद्दल असे विधान ऐकून अरमान मलिक हा चांगलाच रागात आल्याचे बघायला मिळतंय. अरमान मलिक म्हणतो की, तू जिच्याबद्दल हे विधान केले ती एका बाळाची आई आहे हे तरी तू लक्षात ठेवायला हवे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी अरमान मलिक याने विशालच्या कानाखाली मारल्यानंतर त्याला घरात ठेवायचे की, बेघर करायचे याचा निर्णय घरातील सदस्यांवर सोडला. स्पेशल केस म्हणून घरातील सदस्यांनी अरमान मलिक याला माफ केले आहे. मात्र, शो संपेपर्यंत अरमान मलिक हा नॉमिनेशनमध्ये असणार आहे.

यासर्व प्रकारानंतर आता विशाल पांडे याच्या आई वडिलांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी अरमान मलिक याला बेघर करण्याची मागणी केलीये. विशालचे आई वडिल म्हणाले की, आम्ही त्याला अजून एकदाही मारले नाहीये आणि अरमानने त्याच्या कानाखाली मारलीये. यासोबत व्हिडीओमध्ये विशाल पांडे याची आई रडताना देखील दिसत आहे.

दुसरीकडे अरमान मलिक याचे चाहते म्हणत आहेत की, अरमान मलिक याने जे केले ते योग्यच केले आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबद्दल बोलले हे शब्द ऐकून घेऊ शकत नाही. लोक अरमान मलिक याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत. आता हा वाद चांगलाच वाढताना दिसतोय. लोकांचे म्हणणे आहे की, अरमान मलिक पती आहे आणि त्याच्या पत्नींबद्दल असे कसे ऐकून घेऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;