गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगड भिरकावला

गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगड भिरकावला

बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर मिंधे गटाचे गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. या वेळी शिरसाट यांच्या पत्नी, कन्या व मुलगा गाडीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

शिरसाट यांचे कुटुंबीय गाडीने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला भांडणे सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकला. त्यामुळे चालक आणि कुटुंबीय खाली उतरले. त्या वेळी तो दुचाकीस्वार पळून गेला. गाडीला धक्का लागल्याने थोडा गोंधळ झाला, असे आमदार शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;