सावध राहा! तब्बल 995 कोटी पासवर्ड हॅक, सेलेब्रिटींचे महत्त्वाचे डिटेल्सही लीक
सायबर हल्ल्यापासून सेलिब्रिटीच काय तर पोलीसही वाचू शकलेले नाहीत. सायबर हल्ले पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले असून आतापर्यंत तब्बल 995 कोटी पासवर्ड हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सेलेब्रिटींचे महत्त्वाचे डिटेल्सही लीक झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा पुन्हा चव्हाटय़ावर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे. bamacare नावाच्या हॅकरटीमने तब्बल 995 कोटी पासवर्ड हॅक केले असल्याची माहिती Rockyou2024 नावाच्या एका अहवालातून उघड झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List