बारसू प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांची उद्या विधिमंडळावर धडक

राजापूरमधील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी 9 जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशनावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्प रद्द करा अशी त्यांची मागणी आहे.

कोकणचे रासायनिक गटार होऊ नये म्हणून बारसू पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थ गेली तीन वर्षे तेथील प्रस्तावित रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाविरुद्ध संघर्ष करत आहेत. प्रकल्पाला विरोध केल्यामुळे दडपशाहीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून ग्रामस्थ व कोकणवासी, महाराष्ट्रातील पर्यावरणवादी तसेच विविध कष्टकरी जनसंघटना 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. आतापर्यंत विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशन काळात त्यांनी आंदोलने केली, परंतु सरकारने काहीच दखल घेतलेली नाही. बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित न करण्याच्या मागणीवर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला नाही, असे रिफायनरीविरोधी संघटनेने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;