गुजरात सरकारची नाचक्की, अदानींना दिलेली 108 हेक्टर जमीन परत घेणार
देशातील बंदरे, विमानतळे अदानींच्या घशात घालणाऱया गुजरात सरकारवर कच्छ जिह्यात मुंद्रा बंदराजवळ अदानी समूहाला दिलेली सुमारे 108 हेक्टर जमीन परत घेण्याची नामुष्की ओढवली. जनावरांच्या कुरणासाठी असलेली ही जमीन गुजरात सरकारने 2005 मध्ये अदानी समुहाच्या एका कंपनीला दिली होती. खुद्द गुजरात सरकारनेच याबाबतची माहिती गुजरात उच्च न्यायालयाला दिली.
नवीनल गावातील ही कुरणाची 231 एकर जमीन अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडला परस्पर देण्याच्या निर्णयाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List