अकोल्यातील मोरगाव भाकरे गावावर शोककळा! शहीद प्रवीण जंजाळच्या गावात एकही चूल पेटली नाही, चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

अकोल्यातील मोरगाव भाकरे गावावर शोककळा! शहीद प्रवीण जंजाळच्या गावात एकही चूल पेटली नाही, चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

जम्मू-कश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या अकोला जिह्यातील मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ या 24 वर्षीय जवानाचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हा ते सुट्टीत घरी आले होते. ते 2020 मध्ये महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिह्यात त्यांना पाठवण्यात आले होते.

पथकासोबतच कुलगाम जिह्यातील मोडरगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. तेथे सहा दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. चौघांचा खात्मा केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती आहे. रेजिमेंटच्या अधिकाऱयांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमा ज्ञानेश्वर माळी आणि जंजाळ यांच्या कुटुंबयांशी संपर्क साधून प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्याची माहिती दिली. याबाबत कळताच जंजाळ कुटुंब आणि मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. चारच महिन्यांपूर्वी प्रवीण यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी आणि आईने अक्षरशः हंबरडा पह्डला. त्यावेळी गावकऱयांचे मनही हेलावले. त्यांच्या पश्चात  पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

ती भेट शेवटची ठरली

चार महिन्यांपूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबीयांसोबतची ही भेट शेवटची ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी अक्षरशः रात्र जागून काढली. प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्यांच्या आधी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि काका रवींद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, प्रवीण यांनी कालच घराच्या बांधकामासाठी त्यांच्या वडिलांसाठी 39 हजार रुपये पाठवले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;