नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला…; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला…; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्ध आणि संजना हे ‘समृद्धी’ बंगला पाडून त्या जागेवर टॉवर उभा करण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण त्यांच्या स्वप्नपूर्तीला अरुंधतीचा विरोध आहे. आई आणि अप्पा यांच्या घरावर त्यांचा हक्क आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं अरुंधती ठणकावून सांगते. मालिकेत हा असा ट्रॅक सुरु असतानाच अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी नातेसंबंधांवर भाष्य केलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

अनिरुद्ध चा possessiveness
अनिरुद्ध आणि अरुंधती चं नातं दिवसान दिवस बिगडत चाललंय, आणि त्यांच्या बिघडलेल्या नात्यामुळे
त्या दोघांशी connected असलेल्या लोकांचे म्हणजेच पात्रांचे हाल होताहेत. एकदा एखादं नातं बिघडलं की ते परत पूर्वीसारखं व्हायला फारच मुश्किल असतं, पूर्वी जो प्रेम आपुलकी आदर होता तो परत तसाच येईल याची काही guarantee नाही, एखाद्या धागा जर तुटला तर पुन्हा त्याला एक सारखं करण्यासाठी आपण गाठ मारतो , तो धागा परत पूर्वीसारखा होत नाही त्यामध्ये एक गाठ असते आणि काही नात्यांमध्ये तर अनेक गाठी निर्माण होतात किंवा त्या नात्यांचा अगदी गुंता होऊन जातो, आणि तो गुंता बरेच जणांना आयुष्यभर सोडवताच येत नाही.

“आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये नात्यांची जी गुंतागुंत आहे ती इतकी भारी आहे की आपण पण त्याच्यामध्ये गुंतत जातो!
या मालिकेमध्ये इतक्या घडामोडी घडत असतात की आपल्याला उसंतच मिळत नाही . परत प्रत्येक वेळेला काही ना काही तरी घडतच असतं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आश्चर्यच वाटत राहतं की अरे याचाच आपण विचारच केला नव्हता.  हे असं कसं घडलं आणि तेवढ्याच दहा-बारा कॅरेक्टर मध्ये हे सातत्याने घडवायचं असतं सातत्याने उत्सुकता वाढवायची असते हे फारच कठीण काम आहे जे नमिता सतत करत असते ती करत असताना तिची होणारी ओढाताणआम्हाला बघायला मिळते.

खूपसे लोक ही मालिके मधल्या पात्रांशी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडत असतात आणि मलाही असं वाटतं की थोडं फार साम्य असू शकेल पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ही एक मालिका आहे ही काय सत्य घटनेवर आधारित एखादी गोष्ट किंवा एखाद्याचं खरं खरं आयुष्य नाही.

मालिका म्हणजे दिवसातून एक अर्धा तास एका वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते. जे प्रेक्षकांना आपलंसं वाटेतं आणि खरं वाटतं , याचा अर्थ ते खरं खरं आहे असं होत नाही, अनेक लोक प्रामाणिकपणे ही मालिका दररोज बघत असतात, मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं, त्यातल्या अनेक लोकांना हे सगळं खरोखर आहे असंच वाटत असतं. कधीतरी या खऱ्या शूटिंगचा अनुभव घ्यायला मिळाला तर लक्षात येईल एकही कलाकारा त्या पात्रच्या मूळ स्वभावाप्रमाणे नाहीहे. प्रत्येक जण अगदीच वेगळा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;