बीडमध्येही हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक फरार

बीडमध्येही हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक फरार

सध्या पोलीस भरती राज्यभरात सुरू असून पोलिसांवर या भरतीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रविवारी (दि.7) सकाळी सातच्या सुमारास नेकनूर हद्दीत दुचाकीवरून जात असणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या वाहनाला कारने जोराची धडक दिली. यात दिंद्रुड पीएसआय श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कारचालक फरार झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग 548 वरून आज रविवारी सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकी वरून जात होते. यावेळी स्विफ्ट कारने धडक दिल्याने यात श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून कारचालकाने पळ काढल्याचे कळते.

चंद्रकांत गोसावींची तत्परता

घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणातच नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गंभीर जखमी असलेल्या रमेश धोंडीराम नागरगोजे यांना उपचारासाठी बीडमधील खाजगी रुग्णालयात त्यांनी दाखल केले. तसेच अपघातातील वाहने तातडीने नेकनूर पोलीस ठाण्यात त्यांनी आणून लावली होती. गोसावी यांच्या कार्यतत्परतेमुळे नागरगोजे यांना लवकर उपचार मिळाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;