काही लोकं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात, त्यांनंतर ते… लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची जीभ घसरली

काही लोकं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात, त्यांनंतर ते… लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची जीभ घसरली

बिहारच्या रुपैली मतदार संघामध्ये 10 जुलै रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्या दरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच नितीश कुमार एका सभेमध्ये संबोधीत करताना त्यांची जीभ घसरली. लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता ते म्हणाले, काही लोकं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात आणि त्यांनतर ते कुटुंबातच अडकून राहतात असे ते म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उमेदवार कलाधर मंडल याच्या प्रचारासाठी त्यांनी रुपौली येथे सभा घेतली.  त्यावेळी संबोधीत करताना नितीश कुमार यांनी लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्यावर घराणेशाहीवर बोलले. त्यानंतर राजदच्या उमेदवार बीमा भारती यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. बीमा भारती यांच्यावर टीका करताना बोलले की, बीमा यांना कसे बोलावे हे देखिल माहित नव्हते आणि त्यांना मंत्री बनवले होते. 3 वेळा माझ्याच पक्षातून आमदार झाल्या, मंत्री बनवण्याचा आग्रह केला. मात्र दुसऱ्याला संधी दिल्यावर मात्र त्या खासदार बनायला निघाल्या, मात्र निकाल आल्यानंतर त्या तिसऱ्या नंबरवर आल्या असे म्हणाले. पुढे ते म्हणाले, काही जणं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात, त्यानंतर घराणेशाहीतच अडकून राहतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;