‘उतरन’मधील छोटी ‘इच्छा’ आता दिसते अशी; फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क!
'उतरन' या मालिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये छोटी इच्छा साकारणारी चिमुकली तुम्हाला आठवतेय का? दोन वेळ्या घातलेली ही इच्छा घराघरात लोकप्रिय होती. आता तीच इच्छा मोठी झाली असून तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. 'उतरन' ही अशीच एक मालिका होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत गरीब मुलगी इच्छाची भूमिका स्पर्श खानचंदानीने साकारली होती.
'उतरन' या मालिकेत दोन मुलींची कथा दाखवण्यात आली होती. यामध्ये एक मुलगी श्रीमंत असते तर दुसरी गरीब. गरीब इच्छाच्या मालिकेतील स्पर्शला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. ती आता मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
स्पर्श खानचंदानीला पाहून आता कोणीच म्हणू शकत नाही की ही तीच छोटी इच्छा आहे, जी इतकी लोकप्रिय झाली होती. 'उतरन'च्या यशानंतर स्पर्शला बऱ्याच ऑफर्स मिळाल्या असतील, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र आता स्पर्श अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List