Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना, बल्लापूरमध्ये कापड दुकानात हल्ला

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना, बल्लापूरमध्ये कापड दुकानात हल्ला

चंद्रपूर शहरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता बल्लारपूर शहरात पुन्हा तशीच घटना उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील गांधी चौकातील एका कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून मालकांवर गोळीबार करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. घटनेनंतर आरोपी पसार झाले.

गांधी चौक परिसरात मालू कापड दुकान आहे. दुचाकीवरून तीन जण या दुकानाजळ आले. त्यानंतर त्यांनी दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकल्यानंतर तिघांनीही दुकानात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात दुकानातील एक कामगार जखमी झाला. अन्य कामगार सुदैवाने सुखरूप आहेत.

कार्तिक साखरकर असे जखमी कामगाराचे नाव आहे. दुकानाचे मालक सुरेश मालू आणि सुनील मालू यांच्यावर हा हल्ला करण्याचा आरोपींचा कट असल्याचे समजते. आरोपी पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वर्षभरापूर्वी याच दुकानाला आग लागली होती. आगीत दुकान जळून खाक झाले होते. याप्रकरणातील संशयित आरोपी सूरज गुप्ता गेल्या वर्षभरापासून फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेच्या जिल्हाधिकाऱ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात मनसे कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार जखमी झाला होता. या घटनेला तीन दिवस उलटत नाहीत तोच दुसरी घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;