हिना खान करतेय कॅन्सर झाल्याचं नाटक? ‘बिग बॉस’ स्पर्धकाकडून मोठा खुलासा

हिना खान करतेय कॅन्सर झाल्याचं नाटक? ‘बिग बॉस’ स्पर्धकाकडून मोठा खुलासा

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान हिला कॅन्सर झाल्याची माहिती समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. वयाच्या 36 व्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समोर आले आहे. नुकताच, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केमोथेरपीमुळे तिच्या शरीरावर झालेल्या खुणा तिने दाखवल्या.

अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना अभिनेत्रीसाठी प्रार्थना करत चिंता व्यक्त केली. पण एका बिग बॉस स्पर्धकाने हिना फक्त कॅन्सर झाल्याचं नाटक करत आहे… असं सांगितंल आहे. हा बिग बॉस स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा स्पर्धक पुनीत सुपरस्थार आहे. सध्या पुनीत याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by prakash kumar (@puneetsuper_starrrr)

 

पुनीत व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, ‘जर हिनाला खरंच कॅन्सर झाला असेल तर, आपल्या आजाराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट कोण करतं. आजाराचे रिपोर्ट पोस्ट कोण करतं. आराजाबद्दल सांगून फक्त व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्याचं काम करत आहे. काही दिवसांनंतर हिना एक पोस्ट करेल… फॅन्स, आता माझी प्रकृती स्थिर आहे…. तुमचं प्रेम आणि शुभेच्छांचे आभार…’

एवढंच नाही तर, व्हिडीओ पोस्ट करत पुनीत याने लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. ‘फॅलोअर्स वाढवण्यासाठी ट्रिक…’ सध्या सर्वत्र पुनीत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

एक नेटकरी पुनीतवर संताप व्यक्त करत म्हणाला, ‘खरंच हा पागल झाला आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू सुद्धा काही महिन्यांपूर्वी आजारी पडला होतास…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला हार्ट अटॅक आला होता…’ अशा प्रकारे अनेकांनी पुनीत याला ट्रोल केलं आहे.

हिना खान हिची पोस्ट

काही दिवसांपूर्वी, हिना खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, ‘या आजारावर मात करण्यासाठी मी मजबूत, दृढनिश्चय आणि पूर्णपणे वचनबद्ध आहे. माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत.’ सध्या सर्वत्र हिना खान हिची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;