ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिनाशी लग्न करणार का? बॉयफ्रेंडचं उत्तर ऐकून अभिनेत्रीचेही डोळे पाणावतील

ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिनाशी लग्न करणार का? बॉयफ्रेंडचं उत्तर ऐकून अभिनेत्रीचेही डोळे पाणावतील

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. हिना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कॅन्सरशी झुंज देतानाचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर करतेय. ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना तिच्या असंख्य चाहत्यांकडून करण्यात येत आहेत. अशातच हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालची प्रतिक्रिया समोर आली आहे. हिना आणि रॉकी गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हिना 36 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलं नाही. या दोघांना आधीही लग्नावरून अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. आता हिनाच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर रॉकीला पुन्हा एकदा लग्नाविषयी सवाल करण्यात आला.

हिनासोबतच्या नात्यावर रॉकी म्हणाला, “आमचं नातं इतकं हलकं नाही की अशा अडथळ्यांमुळे तुटेल. जोपर्यंत हिना पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत मी तिची प्रतीक्षा करेन. मला लग्नाची काहीच घाई नाही. हिना कॅन्सरमुक्त व्हावी, अशी माझी इच्छा आहे. आम्ही चांगल्या-वाईट काळात एकमेकांसोबत कायम होतो आणि पुढेही राहणार.” रॉकीच्या या प्रतिक्रियेचं हिनाच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे. हिना आणि रॉकी यांची पहिली भेट ‘ये रिश्ता..’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. हिना या मालिकेत मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी हा या मालिकेचा निर्माता होता.

हिना सध्या कर्करोगावरील उपचार घेत आहे. सर्जरीनंतर तिच्यावर किमोथेरेपी सुरू आहे. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं आहे. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;