‘इतकी प्यायची तरी कशाला? धड चालताही येईना’; उर्फी जावेद तुफान ट्रोल

‘इतकी प्यायची तरी कशाला? धड चालताही येईना’; उर्फी जावेद तुफान ट्रोल

आपल्या अतरंगी फॅशनमुळे आणि अंगप्रदर्शनामुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या चालण्यामुळे चर्चेत आला आहे. पापाराझींनी शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत तिची बहीणसु्द्धा आहे. बहीण उर्फीचा हात पकडून तिला चालण्यास मदत करतेय. या व्हिडीओ उर्फी पूर्णपणे नशेत असल्याचं पहायला मिळतंय. म्हणूनच तिला नीट चालताही येत नाही. तिची बहीण तिचा हात पकडून गाडीपर्यंत घेऊन जाते. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला जोरदार सुनावलं आहे.

आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असली तरी उर्फीने गेल्या काही महिन्यांत तिची प्रतिमा सावरली होती. उर्फीच्या काही ड्रेसेसमधील कल्पकता नेटकऱ्यांना आवडू लागली होती. इतकंच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तिचं कौतुक केलं होतं. सोशल मीडियावर तिची प्रतिमा सावरली असतानाच उर्फीचा हा नशेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. उर्फी दारूच्या इतक्या नशेत आहे की तिला धड चालताही येत नाहीये, हे स्पष्ट यामध्ये पहायला मिळतंय. ‘उर्फीला दारू जास्त झाली’, असं एकाने लिहिलं. तर ‘उर्फीचा हा सगळा ड्रामा आहे, सुरुवातीची काही पावलं ती नीट चालत होती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘उर्फी पूर्णपणे नशेत दिसतेय’, असंही अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

उर्फी जावेद म्हटलं की डोळ्यांसमोर चित्रविचित्र कपड्यांमधील तरुणीच येते. उर्फी तिच्या अजबगजब फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. घरातल्या विविध वस्तूंपासून, वर्तमानपत्रापासून, साखड्या, दोरखंड यांसारख्या वस्तूंपासूनही तिने कपडे डिझाइन केले आहेत. मात्र अनेकदा अंगप्रदर्शन केल्याने तिच्यावर सतत टीका झाली आहे. उर्फीचे काही ड्रेस कौतुकास पात्रही ठरले आहेत. अभिनेत्री करीना कपूर, जान्हवी कपूर यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं होतं.

उर्फीने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिलं होतं. “काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असं ती म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;