Worli hit and run – भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवलं; महिलेचा मृत्यू, मिंधे गटाचा उपनेता, मुलगा व ड्रायव्हर ताब्यात

Worli hit and run – भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवलं; महिलेचा मृत्यू, मिंधे गटाचा उपनेता, मुलगा व ड्रायव्हर ताब्यात

मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात आता महत्त्वाची अपडेट आली असून दुचाकीला धडक देणारी कार मिंधे गटाचा उपनेता राजेश शहा यांची असल्याचे उघड झाले आहे.

राजेश शहा हा मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता आहे. अपघात झाला तेव्हा राजेश शहा हे देखील कारमध्ये होते आणि त्यांचा मुलगा मिहीर ही कार चालवत होता. अपघातात जखमी झालेल्या पीडित व्यक्तीने पोलिसात तसा जबाब दिला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा, फरार होण्याच्या तयारीत असणारा त्यांचा मुलगा मिहीर आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;