Yavatmal News : वणीमध्ये लाकडाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे फर्निचर जळून खाक

Yavatmal News : वणीमध्ये लाकडाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे फर्निचर जळून खाक

यवतमाळमधील वणी येथे भगवान सॉ मिल या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.

वणी येथील दीपक चौपाटी परिसरात भगवान सॉ मिल दुकानाला आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पसरले होते. आग आटोक्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत होती.

या दुकानात लाकडी वस्तू बनवण्याचे काम चालते. दुकानाच्या मागच्या बाजूला लाकडाचा भुसा ठेवला जातो. काल मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील लोकांना दुकानाच्या मागच्या बाजूने धूर येताना दिसला. त्यांनी याबाबत सुरक्षारक्षकाला सांगितले. यानंतर दुकानमालकाला आगीची माहिती देण्यात आली.

पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;