Chandrapur News : गाडी चालवता चालवता चालकाला फिट आली, पाच वाहनांना धडक देत थेट बस गॅरेजमध्ये घुसली !
चंद्रपूरमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एसटी बस चालकाला गाडी चालवत असतानाच फिट आल्याने बस अनियंत्रित झाली. त्यानंतर बस पाच वाहनांना धडक देत थेट गॅरेजमध्ये घुसली. या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींपैकी चौघांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन कुळमेथे असे बस चालकाचे नाव आहे.
ब्रम्हपुरी येथून एसटी चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. सिंदेवाही येथील पेट्रोलपंपाजवळ बस येताच चालक सचिनला फिट आली. यामुळे बस अनियंत्रित झाली आणि बसने दोन दुचाकी, एक ट्रॅक्टर व दोन चारचाकी वाहनांना धडक दिली.
वाहनांना धडक दिल्यानंतर बस थेट रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसली. या घटनेत आठ जण जखमी झाले. रोहित पुस्तोडे, किरण मडावी, भगवान पुरम, प्रमोद बुरांडे, ज्योती लांजेवार, तन्मय देवगीरकर, भास्कर गायकवाड, भास्कर सहारे, सीमा वनस्कर, सचिन मसराम, आशिष वनस्कर, अनिरुद्ध लांजेवार, आचल ईरटवार अशी जखमींची नावे आहेत. किरकोळ जखमींवर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List