Jalna crime news – भोकरदनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड, डॉक्टरचा पोबारा

Jalna crime news – भोकरदनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड, डॉक्टरचा पोबारा

भोकरदनमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाने 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजता धाड टाकून कारवाई केली. भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या राजपूत सोनोग्राफी सेंटरवर अवैध गर्भपात केल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार आज पथकाने छापा टाकत डॉ. राजपूत यांच्या अवैधरीत्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली आहे. कारवाईची कुणकुण लागताच डॉक्टरने हॉस्पिटलमधून पोबारा केला. मात्र त्याठिकाणी पथकाने सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारे औषध जप्त केले आहे.

या छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला मोठे घबाड सापडले असून, दोन सोनोग्राफी मशीन, एक अलमारी भरून औषधाच्या गोळ्या, रोख असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यावेळी एक पेशंट सापडला आहे.

ही कारवाई जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. पाटील, नोडल ऑफिसर डॉ.व्ही.जे. घोलप, डॉ. वाकुडे, डॉ. कांबळे, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे, भोकरदन पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस अधिकारी वैद्य, पोलीस कर्मचारी सोनवणे, खरात, खार्डे, राऊत, अरुण वाघ, एकनाथ वाघ, सोमनाथ मंडलिक, शरद शिंदे, संदीप भुतेकर, प्रताप सत्त्व, सुनील सिंबल यांनी केली.

दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;