बाईकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले…एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

बाईकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले…एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून तरुणी मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रिल्स बनवली. यावेळी दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्याला धडकून अपघात झाला. यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी असून, त्याच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी बीड बायपासवर घडली. हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवासी आहेत.

जालना तालुक्यातील गणेशपूर येथील अनिरुद्ध कळकुंबे (वय – 25) असे मयताचे नाव आहे. तर मधू शेळके हा जखमी आहे, दोघेही शक्रवारी सकाळीच दुचाकीवरून (एम.एच. 21 एम. 1154) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधू हा दुचाकी चालवत बायपासवर आल्यावर दुचाकीवर असतानाच अनिरुद्ध याने आपल्या मोबाईल रिल्स बनवण्यासाठी व्हिडिओ तयार करू लागला. यावेळी दुचाकीस्वार मधूचे लक्ष विचलीत झाले असून, बाजूच्या कठड्यावर जाऊन दुचाकी आदळली. यामध्ये अनिरुद्धचा जागीच मृत्यू झाला. तर मधूच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला.

हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून, तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. याप्रकरणाची शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;