त्यांचा एक फोटो पाहण्यासाठी इंस्टाग्रामवर पडतात चाहत्यांच्या उड्या, कोण आहेत ते?
269 दशलक्ष फॉलोअर्ससह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या एका फोटोला लाखो व्ह्यूज मिळतात. क्रिकेटर असण्यासोबतच विराट अनेक जाहिरातींमध्येही दिसतो. पत्नी अनुष्का हिच्यासोबतच्या व्हिडीओवर चाह्त्यांच्या कमेंटचा अक्षरशा पाऊस पडतो.
ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचेही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या एका व्हिडिओला दशलक्ष व्ह्यूज मिळतात. तिचे इंस्टाग्रामवर 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री फॅशनपासून मित्रत्वापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आपल्या व्हिडीओत करते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण जगाला वेड लागले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. इंस्टाग्रामवर पंतप्रधानांना 90.8 दशलक्ष लोक फॉलो करतात.
श्रद्धा कपूर सध्या हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 मुळे चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 90.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. या अभिनेत्रीच्या गोंडसपणाने जगाला वेड लावले आहे. ती तिच्या ग्लॅमरस फोटो आणि रीलसह बरीच प्रसिद्धी मिळवते.
आलिया भट्ट हिचे इंस्टाग्रामवर 84.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. जग तिच्या या सुंदरतेचे वेडे आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी, हार्ट ऑफ स्टोन यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
कतरिना कैफ हिचेही इंस्टाग्रामवर 80 मिलियन फॉलोअर्स आहेत. जग तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस फोटोंचे वेड आहे. ती आपल्या प्रोफाइलवर अनेक उत्कृष्ट रील्स शेअर करते ज्यांना लाखो व्ह्यूज मिळतात.
दीपिका पदुकोणचे इन्स्टाग्रामवर 79.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या अभिनेत्री तिच्या गरोदरपणाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. तिच्या बेबी बंपच्या फोटोंनी चाहते वेडे झाले आहेत.
78.7 दशलक्ष फॉलोअर्ससह नेहा कक्कर इंस्टाग्रामवर सर्वाधिक पसंतीची सेलिब्रिटी आहे. नेहा एक उत्कृष्ट गायिका आणि एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List