जान्हवी कपूर हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार, थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आला मदतीला धावून

जान्हवी कपूर हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार, थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आला मदतीला धावून

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर कायमच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. जान्हवी कपूर ही लवकरच शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच हे तिरूपती बालाजी मंदिरात देखील जोडीने गेले होते. मध्यंतरी तरी तर हीच एक चर्चा रंगताना दिसली की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा देखील केला आहे. मात्र, त्यावर खुलासा होऊ शकला नाही.

आता जान्हवी कपूर ही नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या संगीत सेरेमनीमध्ये शिखर पहाडिया याच्यासोबत पोहोचली होती. यावेळी खास डान्स करताना देखील जान्हवी कपूर दिसली. याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. जान्हवी कपूर ही जबरदस्त लूकमध्ये अंबानींच्या पार्टीत सहभागी झाली होती.

हेच नाहीतर अत्यंत खास कपड्यांमध्ये जान्हवी कपूर ही पोहोचली. मात्र, यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला. भर पार्टीमध्ये जान्हवी कपूर हिचा ड्रेस फाटला. त्यानंतर शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिच्या मदतीला धावून आला. हा ड्रेस अत्यंत खास असा दिसत आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर हिचा ड्रेस शिखर पहाडिया याने डान्सच्या अगोदर कट केल्याचे बघायला मिळतंय. तो ड्रेस अगोदर फाटल्याने शिखर पहाडिया याने असे केल्याचे सांगितले जातंय. एक फोटो तूफान व्हायरल होतोय. या फोटोमध्ये जान्हवी कपूर ही त्रस्त होऊन बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूप जास्त त्रासात दिसत आहे. दुसरीकडे शिखर पहाडिया हा तिचा ड्रेस कट करत असल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

आता हाच फोटो व्हायरल होतोय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, शिखर आणि जान्हवीचे ब्रेकअप झाले. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून अत्यंत मोठ्या संपत्तीचा तो मालक आहे. शिखर पहाडिया याच्या लहान भावाला सारा अली खान ही डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा होती. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;