Jammu-Kashmir : दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक; एक जवान शहीद, एक जखमी
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला आहे. कुलगाममधील मुदरगाम परिसरात तीन ते चार दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते. या दहशतवाद्यांसोबत सैन्य दलाच्या जवानांची चकमक झाली. चकमकीत दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच एका जवानाचा मृत्यू झाला. तर अन्य जखमी जवानावर उपचार सुरू आहेत.
#WATCH | Kulgam, Jammu and Kashmir: Encounter started at Modergam Village of Kulgam District. Police and Security Forces are on the job: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1MC0d2xJhi
— ANI (@ANI) July 6, 2024
गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला असून कारवाई सुरू केली. गेल्या काही दिवसांत भारतीय जवानांनी अनेक कारवाया केल्या आहेत. या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List