ऐश्वर्या राय तरुणपणी दिसायची स्वर्गातील ‘अप्सरा’, 10 फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री ऐश्वर्या रा हिच्या तरुणपणीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्या हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी तर, अभिनेत्रीचा उल्लेख स्वर्गातील अप्सरा असा देखील केला आहे.
आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
ऐश्वर्या हिने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
बॉलिवूडमध्ये करियर करत असताना ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा फक्त इंडस्ट्रीमध्येचन नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील जोर धरू लागल्या होत्या.
ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांनी एकमेकांना जवळपास 6 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या - अभिषेक यांना लग्नाचा निर्णय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.








Comment List