सलमान खान याच्या मनातील गोष्ट ओठांवर प्रेमाबद्दल मोठा खुलासा, ऐश्वर्या राय हिच्या…

सलमान खान याच्या मनातील गोष्ट ओठांवर प्रेमाबद्दल मोठा खुलासा, ऐश्वर्या राय हिच्या…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि धमाका करतात. मोठ्या संपत्तीचा मालक सलमान खान आहे. सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. मात्र, खरी चर्चा रंगली ती म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. हेच नाहीतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर अचानक यांचे रस्ते वेगळे झाले आणि ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले.

ऐश्वर्या राय हिने जरी अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले असले तरीही अजूनही सलमान खान याने लग्न  केले नाहीये. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, ऐश्वर्या राय हिच्या अगोदर एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात सलमान खान होता. सलमान खान याने स्वत:च याबद्दलचा खुलासा केला. हेच नाहीतर त्या अभिनेत्रीच्या वडिलांना देखील सलमान खान लग्नाबद्दल बोलला होता.

सलमान खान याने याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला. सलमान खान हा अभिनेत्री जुही चावलाच्या प्रेमात होता. सलमान खान याने मुलाखतीमध्ये म्हटले की, जुही खूप जास्त सुंदर आहे. मी तिच्या वडिलांना विचारले होते की, तुम्ही माझे लग्न तिच्यासोबत करणार का? परंतू, मला हे माहिती होते की, त्यांच्या मनात नेमके काय आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बोलताना सलमान खान हा चक्क निराश होताना देखील दिसत आहे. तसा सलमान खान याचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ जुनाच आहे. सलमान खान आणि जुही चावला यांनी एकाच चित्रपटात एकसोबत काम केले. ज्यामध्ये सलमान खान याचा केमिओ होता. आता सलमान खानच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

जुही चावला हिने व्यावसायिक जय मेहता याच्यासोबत लग्न केले. दोन मुलेही चुही चावला हिला आहेत. सलमान खान 58 वयाचा असूनही त्याने आतापर्यंत लग्न केले नाहीये. दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दलही विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुबियांपैकी कोणीच काहीच भाष्य केले नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;