Video आज किर्तीचक्र स्वीकारल्यानंतर मला… वीरपत्नी भावूक; अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झाले अंशुमन सिंह
शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातील 10 जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले. यात 7 जवानांना मरणोत्तर किर्ती पदकाने सन्मानित करण्याक आले. या जवानांची पदकं त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारली. यात एक जवान हे कॅप्टन अंशुमन सिंह. किर्ती पदक स्वीकारताना कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती ही अत्यंत भावूक झालेली दिसली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावत आहेत.
या व्हिडीओ सोबतच संरक्षण मंत्रालयाकडून वीरपत्नी स्मृती यांचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात त्या कॅप्टन अंशुमन यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. आठ ते नऊ वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यातच अंशुमन यांची सियाचिनला झालेली बदली हे सगळं सागताना स्मृती यांना अश्रू अनावर झाले.
Cpt #AnshumanSingh was awarded #KirtiChakra (posthumous). It was an emotional moment for his wife & Veer Nari Smt Smriti who accepted the award from #President Smt #DroupadiMurmu. Smt Smriti shares the story of her husband’s commitment & dedication towards the nation. Listen in! pic.twitter.com/SNZTwSDZ1Z
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) July 6, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List