Bigg Boss 17 फेम स्पर्धकाच्या हातात गॅसच्या फुग्यांचा ब्लास्ट, धक्कादायक व्हिडीओ समोर

Bigg Boss 17 फेम स्पर्धकाच्या हातात गॅसच्या फुग्यांचा ब्लास्ट, धक्कादायक व्हिडीओ समोर

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) फेम स्पर्धकाच्या हातात गॅसच्या फुग्यांचा ब्लास्ट झाला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. स्पर्धकाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्या स्पर्धकाच्या हातात गॅसच्या फुग्यांच्या ब्लास्ट झाला आहे, त्या स्पर्धकाचं नाव तहलका प्रँक आहे. तहलका याचं नाव सनी आर्य आहे. पण त्याची ओळख तहलका अशी आहे. युट्यूबर मोठ्या घटनेचा शिकार झाला आहे. संबंधीत घटना सनी याच्या घराबाहेर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहलका त्याच्या घराबाहेर नवीन गाडी घेतल्याचा उत्साह साजरा करत होता. याचदरम्यान तहलका गॅसच्या फुग्यांना आग लावत होता. तेवढ्यात फुग्यांचा ब्लास्ट झाला. संपूर्ण घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. हातात ब्लास्ट झाल्यामुळे सनीचा हात पूर्णपणे जखमी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ब्लास्ट झाल्यानंतर सनी याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सनी याची पत्नी दीपिका आर्य देखील त्याठिकाणी उपस्थित होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by TellyMasala (@tellymasala)

 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ tellymasala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सनी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं दिसत आहे. तर रुग्णालयाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते लाईक्स आणि कमेंट करत चिंता व्यक्त करत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेत तहलका याची पत्नी थोडक्यात बचावली आहे.

दरम्यान सनी उर्फ तहलका याच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. खुद्द सनी याने स्वतःच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. तहलका म्हणाला, ‘आता माझी प्रकृती स्थिर आहे. मी फुग्याला आग लावण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा ब्लास्ट झाला.’ पत्नीसाठी गाडी खरेदी केल्यानंतर सनी कुटुंबासोबत आनंद साजरा करत होता. तेव्हाच ही धक्कादायक घटना घडली.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, ‘ बिग बॉस 17’ मुळे तहलका याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय ‘बिग बॉस’ शोमुळे तहलका याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तहलका याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;