विजयी मिरवणूकीदरम्यान गर्दीत 60 मोबाईल लंपास
जगज्जेत्या हिंदुस्थान संघाची विजयी मिरवणूकीत आनंदोत्सव साजरा करताना क्रिकेटप्रेमींचे 60 मोबाईल गहाळ झाले. सुदैवाने चेंगराचेंगरीचे प्रकार घडले नाहीत. विनयभंगाची तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गर्दीत हजारो चपलांचा खच मात्र रस्त्यावर पडलेला होता. टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर मायदेशी परतलेल्या हिंदुस्थानी संघाचा मुंबईच्या समुद्रकिनारी अभूतपूर्व असा स्वागत सोहळा रंगला. लाखो चाहत्यांनी आपल्या विजयीवीरांचे अभिनंदन करण्यासाठी दुपारी दोन वाजल्यापासूनच मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम परिसरात हजेरी लावली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List