सोनाक्षी सिन्हाचं प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य, लग्नानंतर मान्य केलं मोठं सत्य

सोनाक्षी सिन्हाचं प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य, लग्नानंतर मान्य केलं मोठं सत्य

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नामुळे सर्वत्र वाद निर्माण झाले होते. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. आता लग्नाच्या 10 दिवसांनंतर देखील सोनाक्षी हिचं खासगी आयुष्य चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री पतीसोबत रुग्णालयात पोहोचली होती. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

लग्नानंतर सोनाक्षी हिला पतीसोबत रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आल्यामुळे अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला. सोनाक्षी प्रेग्नेंट असल्यामुळे लग्नाची घाई करण्यात आली… असं देखील चाहते म्हणत होते. पण आता सोनाक्षी हिने लग्नानंतरच्या आयुष्यावर आणि प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनक्षी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सांगायचं झालं तर, लग्नानंतर सोनाक्षी पुन्हा कामावर परतली आहे. अभिनेत्री सध्या आगामी हॉरर ‘ककूडा’ सिनेमात व्यस्त आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षीला लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सर्वात आनंदी गोष्ट म्हणजे, पूर्वी सारखंच वाटत आहे. लग्नाआधीच माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. आता मी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनात चांगल्या भावना आहेत.’

पुढे अभिनेत्री प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आलं. यावर सोनाक्षी म्हणाली, ‘लग्नानंतर फक्त मी रुग्णालयात जाऊ शकत नाही. कारण रुग्णालयात गेल्यानंतर लगेच प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगतात… फक्त एवढाच फरक लग्नानंतर आयुष्यात झाला आहे..’ सोनाक्षी रुग्णालयात वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या विचारपूस करण्यासाठी पोहोचली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वांद्रे येथील घरात सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;