दुधाला 30 रुपये दर, पाच रुपयांचे अनुदान; दूध पावडरलाही मिळणार अनुदान

दुधाला 30 रुपये दर, पाच रुपयांचे अनुदान; दूध पावडरलाही मिळणार अनुदान

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱयांना प्रतिलिटर 30 रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांनी दिली. 1 जुलैपासून हे दर लागू होणार असून दूध पावडरसाठी प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱयांना दिलासा मिळावा यासाठी राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती. या बैठकीत मंत्री पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी व दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱयांना प्रतिलिटर 30 रुपये भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर सरकार शेतकऱयाला

5 रुपये प्रतिलिटर अनुदान दूध उत्पादक शेतकऱयांच्या खात्यात वर्ग करेल. जेणेकरून शेतकऱयाला प्रतिलिटर 35 रुपये मिळतील. यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे ते म्हणाले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला संमती दर्शवली. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल, असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;