अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक निवडणूक कामातून वगळणार
लोकसभा निवडणुकीत महापालिकेतील अत्यावश्यक सेवेत मोडणाऱया रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱयांना निवडणूक कामांसाठी नेमण्यात आले होते. मात्र आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतून रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱयांना निवडणूक कामातून वगळण्यात येईल. त्याऐवजी इतर व्यवस्था करून देण्यात येईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अतितातडीच्या सेवा विभागातील कर्मचाऱयांना विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या कामात जुंपू नका. केईएममधील शववाहिनीवरील चालकाला निवडणूक कामासाठी नेमण्यात आले होते. ही शववाहिनी बंद होती. त्याचा गैरफायदा खासगी शववाहिका चालकांनी घेतला आणि मृतांच्या नातेवाईकांची लुटमार केली. पालिका रुग्णालयातील यानगृहातील रिक्त पदे तातडीने भरा, अशी विशेष उल्लेख सूचना विलास पोतनीस यांनी मांडली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List