आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे पंढरपूर/मिरजसाठी 64 विशेष गाड्या चालवणार

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे पंढरपूर/मिरजसाठी 64 विशेष गाड्या चालवणार

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी 64 आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. आषाढी एकादशीला भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून या 64 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
तपशील खालीलप्रमाणे आहेत

नागपूर – मिरज विशेष (2 सेवा)
गाडी क्रमांक 01205 विशेष १४.०७.२०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01206 विशेष १८.०७.२०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे व अरग हे थांबे असतील. या गाडीत 1 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.

नागपूर – मिरज विशेष (2 सेवा)
गाडी क्रमांक 01207 विशेष गाडी १५.०७.२०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01208 विशेष गाडी १९.०७.२०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे व अरग हे थांबे असतील. या गाडीत 2 तृतीय वातानुकूलित, 14 शयनयान व 2 सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.

नवी अमरावती – पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01119 विशेष नवी अमरावती येथून १३.०७.२०२४ आणि १६.०७.२०२४ (2 सेवा) रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून १४.०७.२०२४ आणि १७.०७.२०२४ (2 सेवा) रोजी १९.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल. या गाडीत बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी हे थांबे असतील. या गाडीत 2 तृतीय वातानुकूलित, 7 शयनयान, 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.

खामगाव – पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव १४.०७.२०२४ आणि १७.०७.२०२४ (2 सेवा) रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून १५.७.२०२४ आणि १८.७.२०२४ (2 सेवा) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी हे थांबे असतील. 2 तृतीय वातानुकूलित, 7 शयनयान , 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.

लातूर – पंढरपूर (10 सेवा)
गाडी क्रमांक 01101 स्पेशल लातूर येथून १२.०७.२०२४, १५.०७.२०२४, १६.०७.२०२४, १७.०७.२०२४ आणि १९.०७.२०२४ (5 सेवा) ला ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01102 विशेष पंढरपूर येथून दि. १२.०७.२०२४, १५.०७.२०२४, १६.०७.२०२४, १७.०७.२०२४ आणि १९.०७.२०२४ (५ सेवा) रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल. या गाडीला हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशीव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब हे थांबे असतील. या गाडीत 1 प्रथम तथा द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.

भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष (2 सेवा)

गाडी क्रमांक 01159 अनारक्षित विशेष भुसावळ येथून १६.०७.२०२४ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01160 अनारक्षित विशेष पंढरपूर येथून दि. १७.०७.२०२४ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डूवाडी हे थांबे असतील. या गाडीत 5 शयनयान आणि 2 सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅनसह 13 सामान्य द्वितीय श्रेणी अशी संरचना असेल.

मिरज – पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (20 सेवा)

गाडी क्रमांक 01107 मेमू विशेष मिरज येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01108 मेमू विशेष पंढरपूर येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. या गाडीला अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद आणि सांगोला हे थांबे असतील. या गाडीला १२ सामान्य मेमू डबे असतील.

मिरज – कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (20 सेवा)

गाडी क्रमांक 01209 मेमू विशेष मिरज येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) पर्यंत १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01210 मेमू विशेष कुर्डुवाडी येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) पर्यंत २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल. या गाडीला अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब हे थांबे असतील. या गाडीला 12 सामान्य मेमू डबे असतील.

आषाढी विशेष गाडी क्रमांक 01205, 01206, 01207, 01208, 01119, 01120, 01121, 01122, 01101 आणि 01102 साठी आरक्षण ०७.०७.२०२४ पासून संगणकीकृत केंद्रावर उपलब्ध होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;