Mirzapur 3 Twitter Review: सीरिजमध्ये कालिन भैय्या फक्त शो-पीस… प्रेक्षकांमध्ये नाराजी

Mirzapur 3 Twitter Review: सीरिजमध्ये कालिन भैय्या फक्त शो-पीस… प्रेक्षकांमध्ये नाराजी

‘गजब भौकाल है रे बाबा…।’ हे आम्ही नाही तर, खुद्द प्रेक्षक म्हणत आहेत. मिर्झापूर सीझन 3′ 5 जुलै रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. ‘मिर्झापूर’ सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ‘मिर्झापूर’ सीरिजचा तिसरा सीझन रटाळ आहे असं देखील अनेक जण म्हणत आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षक प्रतिक्रिया देखील देत आहेत. तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून ‘मिर्झापूर’ सीरिजचा तिसरा सीझन कसा आहे जाणून घेऊ…

सांगायचं झाले गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ‘मिर्झापूर 3’ सीरिजच्या प्रतिक्षेत होते. पण सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. सीरिजमधील सातवा एपिसोड बकावास असल्याचं देखील प्रेक्षकांनी सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि मिर्झापूर 3′ सीरिजची चर्चा रंगली आहे.

 

 

 

‘मिर्झापूर 3’ पाहिल्यानंतर एक नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहिलं, ‘बाबूजी का ही बेटा है। मिर्जापुर सीजन 3 गजब भौकाल है रे बाबा। कंट्रोल, पावर, इज्जत।’, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने बीना त्रिपाठी आणि नोकराणीचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये कालिन भैय्याचा मुलगा डिस्कव्हरी पाहाता-पाहात रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, ‘बाऊजी का ही बेटा है।’

 

 

‘मिर्झापूर सीझन 3’ च्या सुरुवातीलाच मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याचा मृतदेह तिथे ठेवण्यात आला आहे, मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसतो. तर पूर्ण सीझनमध्ये कालीन भैय्या एका शो-पीससारखा असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. जुन्या कालाकारांना योग्य प्रकारे दाखवण्यात आलेलं नाही.. असं देखील नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

 

 

‘मिर्झापूर सीझन 3’ सीरिजसाठी नेटकऱ्यांनी दिली 2 रेटिंग

एक नेटकरी म्हणाला, ‘फार काही राहिलं आहे… 3 मध्ये फार उत्साह वाटला नाही. जो 1 आणि 2 मध्ये होता.’, ‘कोणता चांगला डायलॉग नाही… मी 5 मधून फक्त 2 रेटिंग देईल…’, काहींनी तर, मुन्ना भैय्याचे फोटो पोस्ट करत ‘मुन्ना भैय्या अमर रहे…’ असं लिहिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;