Mirzapur च्या निर्मात्यांना मोठा फटाका; सगळे एपिसोड झाले ऑनलाईन लीक

Mirzapur च्या निर्मात्यांना मोठा फटाका; सगळे एपिसोड झाले ऑनलाईन लीक

अ‍ॅमेझॉन प्राईमवरील बहुचर्चित वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या सिजन 3 ची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. मिर्झापूरच्या सिजन 3 ला गुरुवारी मध्यरात्रीपासून स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली. मिर्झापूरच्या दोन्ही सिजनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या नव्या सिजनची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. मात्र हा सिजन रिलीज होतानाच मिर्झापूरच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. या सिझनचा पहिला एपिसोड रिलीज झाल्यानंतर काही वेळातच ही वेब सिरीज ऑनलाईन लीक झाली आहे.

मिर्झापूर या वेब सिरीजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या वेबसिरीजमधील कालीन भय्या, बबलू, गुड्डू, मुन्ना, गजगामिनी यांच्या भूमिकाही गाजल्या. त्यामुळे अनेक चित्रपट प्रेमींनी खास या वेब सिरीजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओचे सब्स्क्रिप्शन घेतले होतो. मात्र एकीकडे या सिरीजचा एक एपिसोड रिलीज होताच दुसरीकडे ही संपूर्ण वेब सीरिज एचडी क्वालिटीमध्ये लीक झाली आहे. त्यामुळे या सिरीजच्या निर्मात्यांना, कलाकारांना आणि संपूर्ण टीमला याचा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

यंदाच्या सिझनमध्ये दहा एपिसोड असणार आहेत. या वेब सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘पंचायत 3’ चे सचिवजी म्हणजेच जितेंद्र कुमार ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;