रोहित शर्माचा ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता जीव, ती अभिनेत्री मात्र विराटला…

रोहित शर्माचा ‘या’ अभिनेत्रीवर जडला होता जीव, ती अभिनेत्री मात्र विराटला…

T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं. क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात चाहते वानखेडे स्टेडियमपर्यंत जाताना दिसले आणि टीममधील खेळाडू सर्वांनी विजयी रॅलीमध्ये आनंद घेतला. सध्या ऐतिहासिक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय क्रिकेटपटूंच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. सांगायचं झालं तर, क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचं फार जवळचं नातं आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली याने अनेक वर्ष अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला डेट केल्यानंतर लग्न केलं. दोघे आता एकमेकांना कपल गोल्स देताना दिसतात. विराट कोहली याचं बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न झालं. पण एक अभिनेत्री अशी आहे, जिच्यावर कॅप्टन रोहित शर्मा याचा जीव जडला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री करीना कपूर आहे. करीना कपूर हिच्याबद्दल मनात असलेल्या भावना रोहित शर्मा याने मुलाखतीत व्यक्त देखील केल्या होत्या.

रोहित शर्मा याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. पण करीना कपूर हिला क्रिकेटर म्हणून रोहित शर्मा नाही तर, विराट कोहली आवडतो. एका मुलाखतीत करीना हिने विटार याचा बेस्ट क्रिकेटर म्हणून उल्लेख करत, त्याचं कौतुक देखील केलं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने विराट कोहली याची तुलना क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर यांच्यासोबत केली होती. ‘भारतीय क्रिकेट संघाला जिंकवण्यची क्षमता विराटमध्ये आहे…’ असं देखील करीना म्हणाली होती.

करीनाबद्दल काय म्हणाला होता रोहित शर्मा?

एका मुलाखतीत रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित म्हणाला होता, ‘मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो. मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती..’ असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

करीना कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं. अखेर अभिनेत्रीने 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. सैफ आणि करीना याना दोन मुलं आहेत. दोन मुलांसोबत अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

रोहित शर्माची पत्नी आणि मुल

6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतिका सचदेह यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  रोहित शर्मा आणि पत्नी ऋतिका सचदेह यांना एक मुलगी देखील आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;