महागाईनं जनता त्रस्त; सरकार वसुलीत मस्त, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची आक्रमक घोषणाबाजी

महागाईनं जनता त्रस्त; सरकार वसुलीत मस्त, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची आक्रमक घोषणाबाजी

राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात पावसाळीअधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमावतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’, ‘सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना आमदार अजय चौधरी, राजन साळवी, उदयसिंह राजपूत, विलास पोतनीस, काँग्रेस आमदार भाई जगताप, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राजेश टोपे आदि उपस्थित होते.

भाजी महागली, कडधान्य महागले, खत बियाणे महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई, महागाईने जनता त्रस्त महायुती सरकार वसुलीत व्यस्त अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडीने घोषणा देत महायुती सरकारला घेरले.

सरकार आहे वसुलीत मस्त, महागाईने जनता त्रस्त, खोके सरकार हाय हाय, महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बियाणांचा दर वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाई हाय हाय, केंद्रसरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;