रुढी-परंपरेला छेद देत दिराचा विधवा भावजयीशी विवाह, शेवगाव येथील विवाहाची चर्चा

रुढी-परंपरेला छेद देत दिराचा विधवा भावजयीशी विवाह, शेवगाव येथील विवाहाची चर्चा

पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाजव्यवस्थेकडून मर्यादा येतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेवगाव येथील सौरभ शिंदे या अविवाहित तरुणाने रूढी-परंपरांना छेद देत विधवा भावजयीशी विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मोठा भाऊ गौरव यांच्या मृत्यूनंतर सौरभने बाळासह विधवा भावजयीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

शेवगाव येथील गौरव शिंदे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी गंगा खुळे हिच्याशी झाला. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना दोन गोंडस मुलेही झाली. मात्र, त्यांच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि गौरव यांचे निधन झाले. गौरवच्या मृत्यूनंतर शिंदे व खुळे कुटुंबीयांनी एकत्र बसून तरुणपणीच विधवा झालेल्या गंगाच्या उर्वरित आयुष्याचा विचार करून मयत गौरवचा लहान भाऊ सौरभ याच्याशी तिचे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानेही आपण गंगासह तिच्या दोन्ही बाळांचा स्वीकार करण्यास तयार असल्याचे सांगत मनाचा मोठेपणा दाखविला. त्यानंतर हा विवाह सोहळा शेवगाव येथे दोन्ही कुटुंबीयांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत 30 जून रोजी पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक सागर फडके, सीताराम लांडे, वसंत देवधर, बाळासाहेब काकडे, शरद मडके यांच्यासह नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;